Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबईतही करोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

मुंबईतही करोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

CoronaVirusमुंबई : पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही करोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईतील सहा संशयितांपैकी दोन जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर चार जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. या सर्वांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ७ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

दुबईहून आलेल्या पुण्यातील दाम्पत्याला करोनाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर त्यांच्यासोबत दुबईला गेलेल्या ४० सहप्रवाशांचा शोध घेण्यात येत होता. यापैकी काही लोकांचा तपास लागल्यानंतर त्यांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचे आज तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांनाही करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे, तशी माहिती राज्य आरोग्य नियंत्रण विभागाने आज दिली. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ७वर पोहोचली असून यापैकी पाच जणांवर पुण्यात उपचार सुरू आहेत. तसेच या दोघांपैकी एक रुग्ण भिवंडीतील असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुंबईतही करोना बाधित रुग्ण आढळल्याचं कळतं. हे दोघेजण दुबईतून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कस्तुरबामध्ये उपचार सुरू आहेत. या दोन्ही रुग्णांच्या कुटुंबीयांची आणि ते ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आले होते, त्या सर्वांची माहिती घेऊन त्यांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments