Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभारतात मोडी लिपी नाही तर फक्त मोदी लिपी दिसते : राज ठाकरे

भारतात मोडी लिपी नाही तर फक्त मोदी लिपी दिसते : राज ठाकरे

Raj Thackeray Narendra Modi,Raj Thackeray, Narendra, Modi,Raj Thackeray, Narendra Modiमुंबई : मनसे आणि भाजप युती करणार असल्याची चर्चा सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपला डिवचले. राज ठाकरे म्हणाले, सध्या भारतात मोडी लिपी नाही तर फक्त मोदी लिपी दिसते असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

मुंबईमध्ये आज मंगळवार (२१ जानेवारी) रोजी राज ठाकरे यांच्या हस्ते अच्युत पालव यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सुलेखनकार अच्युत पालव यांची स्तुती केली. अच्युत पालव यांनी सुलेखनासाठी केलेलं काम अफाट आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. अच्युत पालव यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी सुलेखन, अक्षर चांगलं असणं आणि मोडी लिपी याबाबत भाष्य केलं.

२६ जुलैचा जो पाऊस मुंबईत झाला होता त्यावेळी त्यांचं अनेक साहित्य भिजलं. मात्र त्यांनी सुलेखनासाठीची मेहनत सुरुच ठेवली असंही राज ठाकरे यांनी म्हटलं. माझं अक्षर चांगलं आहे याचं महत्त्वाचं कारण आहे बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील. अक्षर चांगलं असलं की मनालाही समाधान वाटतं. असंही राज ठाकरे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments