Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई महापालिकेत २०२२ मध्ये भाजपचाच महापौर : राम कदम

मुंबई महापालिकेत २०२२ मध्ये भाजपचाच महापौर : राम कदम

Ram Kadam BMC,Ram Kadam, BMC,Ram, Kadamमुंबई : मुंबई महापालिकेत भाजप विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहे. तर २०२२ मध्ये मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार आहे. असा दावा भाजपचे आमदार प्रवक्ते राम कदम यांनी केला. आज मंगळवार ( २१ जानेवारी ) मुंबई भाजपची बैठक संपन्न झाली. त्यानंतर कदम हे माध्यमांशी बोलत होते.

शिवसेनेनं काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केल्यामुळे मुंबई महापालिकेतील भाजप शिवसेना युती तुटली. आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून मुंबई महापालिकेची पुढची तयारी सुरु केली आहे. मुंबईतील विविध प्रश्नावरून सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे.

मुंबई महापालिकेत भाजपला दोन तीन जागांमुळे सत्तास्थापन करता आली नाही. मात्र, भाजपा पूर्ण ताकदीने २०२२ ची मुंबई महापालिका निवडणूक लढणार आणि सत्ता स्थापन करणार असल्याचेही आमदार राम कदम यांनी सांगितले. त्या साठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती असंही आमदार राम कदम यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments