Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेराज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही : शरद पवार

राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही : शरद पवार

Sharad Pawar Raj Thackeray,Sharad Pawar, Raj Thackeray,Sharad Pawar Raj Thackeray,Sharad, Pawar, Raj, Thackerayपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला. राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. काही लोक राज ठाकरे यांचं भाषण ऐकायला येतात. तर काही राज ठाकरेंना पाहायला येतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणाला गर्दी होते, असा चिमटा शरद पवार यांनी काढला आहे.

शरद पवारांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत मनसेच्या सध्याच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. राज ठाकरेंनी तलवारीचं उत्तर तलवारीने आणि दगडाचं उत्तर दगडानं देऊ. असं विधानं केलं होतं. राज यांच्या भाषणात विकास, बेरोजागारी, महागाई बद्दल साधा उल्लेख सुध्दा नव्हता. चिथावणीखोर भाषणामुळे सत्ताधा-यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. या सर्व विषयावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, काही लोक राज ठाकरे यांचं भाषण ऐकायला येतात. तर काही राज ठाकरेंना पाहायला येतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणाला गर्दी होते, असा चिमटा शरद पवार यांनी काढला.

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात राज ठाकरे यांनी ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चात राज्यभरातील मनसैनिक सहभागी झाले होते. मोर्चानंतर आझाद मैदान येथे राज ठाकरेंची सभा झाली होती. या सभेलाही प्रचंड गर्दी दिसली होती. मात्र, यावरुन शरद पवार यांनी मनसेवर निशाणा साधला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments