Friday, May 16, 2025
Homeदेशनिर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी जल्लादच नाही!

निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी जल्लादच नाही!

Nirbhaya Mother and Accused,Nirbhaya Case,Nirbhaya
Image: DNA

नवी दिल्ली: सर्वत्र गाजलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीची तारीख कधीही निश्चित होऊ शकते. ज्या तिहार तुरुंगात ही फाशी दिली जाईल, त्या तिहार तुरुंगात निर्भयाच्या दोषींना फासावर चढवण्यासाठी जल्लादच उपलब्ध नाही. एक महिन्यात फाशीची तारीख जाहीर होईल, पण फाशी द्यायची कशी या चिंतेत तुरुंग प्रशासन आहे. त्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

तिहार तुरुंगात तुरुंग प्रशासन फाशी देण्यासाठी आवश्यक प्रक्रियेवर काम करत आहे. पुढील महिन्याभरात कधीही फाशीची तारीख येऊ शकते. दोषींना कोर्टाद्वारे ब्लॅक वॉरंट जारी केल्यानंतर कुठल्याही दिवशी या नराधमांना फाशीवर लटकवले जाऊ शकते. राष्ट्रपती जर निर्भया प्रकरणातील या दोषींची दया याचिका फेटाळून लावतील तर त्यानंतर हा ब्लॅक वॉरंट जारी होईल आणि फाशीची तारीख निश्चित होईल. जल्लादांची संख्या कमी असल्याने अधिकाऱ्यांनी अनौपचारिक पद्धतीने दुसऱ्या तुरुंगांशी जल्लादांसंबंधीदेखील चर्चा केली आहे. यासोबतच उत्तर प्रदेशच्या काही गावातच चौकशी केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments