मुंबई: आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे लिलाव होणार आहे. मात्र या लिलावाआधी दोन दिग्गज खेळाडूंनी आपले नाव मागे घेतले आहे. आयपीएलमध्ये खेळण्यास माघार का घेतली याची चर्चा क्रिकेट रसीकांमध्ये सुरु आहे.
आतापर्यंत आयपीएलचे 12 हंगाम खेळवण्यात आले आहे. 13 व्या हंगामासाठी 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे. त्याआधी खेळाडूंची अदला बदली तसेच काही खेळाडूंनी रिलीजही करण्यात आले. मात्र, ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदज मिशेल स्टार्क आणि इंग्लंडचा कसोटी कर्णधार यांनी आपले नाव मागे घेतले आहे. सोमवारी लिलावात सामिल होणाऱ्या 971 खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली यात यातून या दोन खेळाडूंचे नाव हटवण्यात आले आहे.
आयपीएलच्या लिलावातून माघार घेण्याचे या दोन्ही खेळाडूंचे कारण धक्कादायक आहे. मिशेल स्टार्क याने व्यस्त असल्यामुळे खेळू शकणार नसल्याचे सांगितले आहे. तर, जो रूटनं चक्क आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक नसल्याचे कारण दिले. जगातली सर्वात महागडी लीग असूनही यातून खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आयपीएल 2020 च्या लिलावात 971 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यात 258 खेळाडू हे विदेशी असणार आहेत.