Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात मोफत वीज मिळणार?

महाराष्ट्रात मोफत वीज मिळणार?

Nitin Raut Free Electricity,Nitin Raut, Free Electricity,Nitin, Raut, Free, Electricity,Raut Free Electricity,Nitin Free Electricity

मुंबई : दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मोफत वीज देण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये हालचाली सुरु आहेत. राज्यात दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

महाराष्ट्रात मोफत वीज देण्यासाठी पडताळणी सुरु आहे. त्या दृष्टीकोनातून सरकार विचार करत आहेत. दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने मोफत वीज दिल्यामुळे आम आदमी पार्टीबद्दल चांगला संदेश गेला आहे. मात्र, महाराष्ट्रावर तत्कालीन भाजप सरकारने कर्जाचा डोंगर उभारल्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला ते शक्य होणार का? यावर बरंच काही अवलंबून राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments