Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमनोरंजनकुणाल कामराची पत्रकार अर्णबच्या कार्यालयाबाहेर निदर्शने

कुणाल कामराची पत्रकार अर्णबच्या कार्यालयाबाहेर निदर्शने

Kunal Kamra,Kunal, Kamraमुंबई : विमान प्रवासात स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने पत्रकार अर्णब गोस्वामीला जाब विचारल्यानंतर आता कुणालने थेट अर्णबच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी हे मंगळवारी दोघेही मुंबई-लखनऊ विमान प्रवासात एकत्र होते. त्यावेळी कुणाल कामराने अर्णबच्या आसनाजवळ जात त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. कुणाल कामरा याने अनेकदा अर्णब गोस्वामीच्या पत्रकारितेच्या हेतूवरच प्रश्न उपस्थित केले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरला झाला होता. त्यानंतर इंडिगोसह चार विमान कंपन्यांनी कुणाल कामराच्या विमान प्रवासावर बंदी आणली. त्यानंतर आज कुणालने अर्णबचे प्रभादेवीजवळील कार्यालयाबाहेर निदर्शने केली.


अर्णब तुला एवढंच सांगू इच्छितो

कुणालने एक पोस्टर हाती घेतले होते. त्यावर ‘अर्णब तुला एवढंच सांगू इच्छितो की मी माफी मागणार नाही!’. कुणालने त्याचा हा फोटो ट्विट केला. या फोटोवर नेटकऱ्यांनी कुणालला पाठिंबा दर्शवला.

दरम्यान, कुणाल कामराच्या विमान प्रवास बंदीचा निर्णय घेण्याआधी आपल्याला कोणतीही विचारणा झाली नसल्याचे इंडिगोच्या कॅप्टने सांगितले आहे. कॅप्टनने दिलेल्या या वक्तव्यामुळे प्रवास बंदीच्या कारवाईवर प्रश्न उभे राहिले आहेत. नियमानुसार, एखाद्या प्रवाशाच्या गैरवर्तवणुकीबद्दल कारवाई करण्यासाठी विमानाच्या कॅप्टनने कंपनीकडे तक्रार नोंदवणे आवश्यक असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments