Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादउभ्या ट्रेलरवर क्रुझर धडकली, चार भाविक ठार

उभ्या ट्रेलरवर क्रुझर धडकली, चार भाविक ठार

करमाड (औरंगाबाद) : देवदर्शनाहून परतताना औरंगाबाद-जालना रोडवर भीषण अपघात घडला. अपघातामध्ये ४ ठार तर ६ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील सर्व बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील इगतपुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते.

काशिनाथ देवरामव मेहेत्रे (६२), नशिराबाद, रवी बबन जाधव (३२) नशिराबाद संगीता गणेश बुंदे (४५) तांदुळवाडी, ऋषीधर देवराव तिडके (५५) गोंदेगाव अशी ठार झालेल्या भाविकांची नावं आहेत. औरंगाबाद- जालना रोडवर गाढेजळगाव शिवारात आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. औरंगाबादहून जालण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव क्रुझरने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रेलरला मागील बाजूने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात चौघे ठार, तर इतर ६ जण जखमी झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments