Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर, उपमहापौरपदी सुहास वाडकर बिनविरोध

मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर, उपमहापौरपदी सुहास वाडकर बिनविरोध

kishori pednekar as mayor of Mumbai,suhas wadkar as Deputy Mayor elected BMC
मुंबई : मुंबईच्या नव्या महापौर म्हणून किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर अ‍ॅड. सुहास वाडकर यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. मुंबईच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभा न केल्यामुळे आज ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच कब्जा कायम आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याची जोरदार तयारी सुरू असल्यामुळे पालिकेत काँग्रेसने महापौर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपचे महापौर बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अकरा वाजता निवडणूक पार पडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments