Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमनोरंजनजामिया : ‘हेच का रामराज्य ?’ ‘या’ अभिनेत्रीचा सवाल!

जामिया : ‘हेच का रामराज्य ?’ ‘या’ अभिनेत्रीचा सवाल!

Sayani Gupta Anger,Sayani Gupta, Anger,Sayani, Guptaमुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा विरोधात (सीएए) जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ (जेएमयू) परिसरात निदर्शने करणा-या विद्यार्थ्यांवर  तैनात असलेल्या पोलिसांसमोरच राम भक्त गोपाल शर्मा नावाच्या गुंडाने गोळीबार केला. ही घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी अभिनेत्री सयानी गुप्ताने ट्विट करुन हेच रामराज्य का? असा सवाल उपस्थित केला आहे.

“तुम्ही याच रामराज्याविषयी म्हणत होतात? हे सारं पाहून भगवान राम यांना आनंद होईल? हिंदुत्व हे हिंदूत्ववादापेक्षा विरुद्ध आहे. पहिले हिंसाचार आणि नंतर आंदोलन करायला सांगतो. त्यानंतर एकता आणि सद्भावनेचा जल्लोष साजरा करतात, असं टिवट सयानीने केलं. तिच्या या ट्विटनंतर साऱ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधलं आहे. सयानीप्रमाणेच स्वरा भास्कर, जिशान अय्यूब, ऋचा चड्ढा यांनीही त्यांचं मत मांडली आहेत.

दरम्यान, महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जामियाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी राजघाटपर्यंत शांतता मोर्चा काढण्याचे ठरवले होते. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात जामियाच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आंदोलन सुरू केले. ते नंतर देशभर पसरले आणि जामियापासून काही अंतरावर असलेला शाहीन बाग हा परिसर आता आंदोलनाचा केंद्रबिंदू बनला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments