Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशनिर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळली

निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा टळली

Nirbhaya Gang Rape accusedनवी दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी पुन्हा टळली आहे. निर्भया प्रकरणातील दोषींना उद्या शनिवार (१ फेब्रुवारी ) रोजी फाशी दिली जाणार होती. परंतु निर्भया प्रकरणातील चारपैकी विनय शर्माची याचिका प्रलंबित आहे. दोषींना फाशी देण्यात येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.

फाशी देण्याची तयारी पूर्ण झाली होती. अशी माहिती तिहार कारागृहाच्या प्रशासनाने दिल्ली न्यायालयात दिली. तिहार कारागृह प्रशासनाच्यावतीने इरफान अहमद पातियाळा हाऊस न्यायालयासमोर हजर झाले होते. पातियाळा हाऊस न्यायालयात फाशी पुढे ढकलण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती.

इरफान यांनी न्यायालयाला सांगितले की, निर्भया प्रकरणातील दोषींपैकी विनय शर्मा यांची याचिका प्रलंबित आहे. अन्य कोणतेही प्रकरण न्यायप्रविष्ट नाही. त्यामुळे उर्वरित तीन जणांना फाशी दिली जाऊ शकते. दोषींना फाशी देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यात कोणतीही बाब बेकायदा नाही, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

याचिकेवर सुनावणी सुरू असताना दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या प्रकारावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंह यांच्या वकील वृंदा ग्रोवर न्यायालयात उपस्थित राहिल्याबद्दल वकिलांनी आक्षेप घेतला. यावरून वकिलांमध्ये वाद झाला. निर्भया प्रकरणातील दोषी पवन गुप्ता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. घटना घडली तेव्हा अल्पवयीन असल्याचा दावा त्याने या याचिकेत केला आहे. न्यायालयाने पवन गुप्ताची याचिका फेटाळून लावली होती. दरम्यान काही वेळापूर्वीच पुढील आदेशांपर्यंत दोषींना फाशी देण्यात येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, निर्भयाच्या चारही दोषींविरोधात डेथ वॉरंट जारी झाले असून, त्यांना १ फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वाजता फाशी दिली जाणार आहे. या चारही आरोपींना २२ जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार होती. तसे डेथ वॉरंटही बजावण्यात आले होते. मात्र, त्यानंतर दोषींपैकी मुकेश सिंह याने दयेचा अर्ज दाखल केला. तो राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर अन्य आरोपी पवन कुमार याने घटना घडली, त्यावेळी तो अल्पवयीन असल्याचा दावा करणारी याचिका केली. अखेर सर्व याचिका फेटाळून लावल्यानंतर पुन्हा १ फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वाजता दोषींना फाशी देण्याचे डेथ वॉरंट जारी करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments