Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकोरोनापासून वाचण्यासाठी मोबाइलवर कॉलरट्यून

कोरोनापासून वाचण्यासाठी मोबाइलवर कॉलरट्यून

Coronavirus Callertune,Coronavirus mobiletune,Coronavirus,Coronavirus ringtone,Coronavirus mobiletoneमुंबई : कोराना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने भारतातही काळजी घेतली जात आहे. नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी मोबाइलव्दारे कॉलवर कोरोनापासून वाचवण्यासाठी काय काळजी घ्यावी. कॉलरट्युनव्दारे माहिती दिली जात आहे.

कॉल केल्यानंतर खोकला ऐकू येतो आणि पुढे कोरोनापासून वाचवण्याचे मार्ग व काय उपाययोजना कराव्यात. त्याची माहिती दिली जात आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या १३ जण मुंबईत तर दोघेजण पुणे येथे भरती आहेत. अद्यापही एकही संशयित रुग्ण आढळून आला नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध माध्यमांतून जनप्रबोधन करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. देशभरात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांच्या मनात भिती कायम असून. नागरिकांनी सध्या तरी कोरोनाचा धसका घेतला असल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments