Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeदेशतीन वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण

तीन वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण

CoronaVirusकोची : भारतातील कोरोनाची रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. केरळमधील कोची येथे एका तीन वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. या चिमुरड्याला कोरोनाची लागण झाल्यामुळं देशात कोविड-१९च्या रुग्णांची संख्या आता ३९ वर गेली आहे.

कोरोनाची लागण झालेला हा मुलगा आपल्या पालकांसोबत इटलीला गेला होता. ७ मार्च रोजी इटलीहून हा मुलगा आपल्या पालकांसोबत दुबईला आला, त्यानंतर कोचीला आल्यानंतर विमानतळावर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर रिपोर्टनुसार तीन वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना व्हायरसनं भारतात शिरकाव केला असून आतापर्यंत रुग्णाची संख्या ३९ वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मधुमेह असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. त्याचं कारण म्हणजे कोरोनामुळे मृत्यू झाला की नाही याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही परंतु सौदी अरेबीयातून हा तरुण भारतात आल्यानंतर त्याला कोरोना व्हायरसची लक्षण दिसत होती. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तरुणाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र रिपोर्ट येण्याआधीच या तरुणाचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे तर या तरुणाचा मृत्यू झाला नाही ना? अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

कोरोना राज्यनिहाय संख्या

राजस्थान १९

तामिळनाडू ०१

केरळ १२

आग्रा ०६

लडाख ०२

उत्तरप्रदेश ०१

तेलंगणा ०१

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments