Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईदिल्ली हिंसाचाराच्या पाश्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट

दिल्ली हिंसाचाराच्या पाश्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट

High alert in Mumbai after of Delhi violenceमुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) ईशान्य दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराविरोधात मुंबईतील मरिन ड्राइव्ह परिसरात सोमवारी 24 फ्रेब्रुवारीच्या रात्री उशीरा आंदोलन करण्यात आले होते.  दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलनकर्त्यांना सोमवारी रात्री उशीरा कँडल मार्च काढण्यास पोलिसांनी अटकाव केला. त्यानंतर गेट वे ऑफ इंडियाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.

 दरम्यान,  आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या अटकावामुळे मरिन ड्राइव्ह गाठत कँडलसह ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी रात्री उशीरा 25 ते 30 आंदोलकांना  ताब्यात घेतले आहे. दिल्लीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हिंसाचार घडू नये  यासाठी विशेष खबरदारी गृहमंत्रालयाकडून घेण्यात आली आहे. आझाद मैदान वगळता शहरात कोठेही आंदोलन करण्यासाठी परवानगी कोणालाही देण्यात येणार नाही असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

High alert in Mumbai after of Delhi violence

दिल्लीत घडलेला हिंसाचार

भारताची राजधानी नवी दिल्लीत सीएए आंदोलनाला हिंसक वळण लागले. सोमवार 24 फ्रेब्रुवारी  पासूनच सीएए समर्थक आणि विरोधत आंदोलनकर्ते एकमेकांसमोर आले आणि एकमेकांवर दगडफेक सुरु केली. सुरुवातीला मौजपूर आणि जाफराबाद मधील हिंसाचार 25 फेब्रुवारीला उत्तरपूर्व दिल्लीतील इतर भागातही पसरत आहे. या हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिस कर्मचाऱ्याबरोबरच सात जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही मुंबईतही हाय अलर्ट दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments