सुपरस्टार सर्वांचा लाडका भायजान अर्थातच अभिनेता सलमान खानचा आज वाढदिवस. सलमानने आज शुक्रवार (27 डिसेंबर) रोजी वयाची 54 वर्षे पूर्ण केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला म्हणजे गुरुवारी सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खानच्या मुंबईतील पाली हिलस्थित घरी एका जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत सलमानचे संपूर्ण कुटुंबीय सहभागी झाले होते. सलमानचे आईवडील सलमा खान आणि सलीम खान सोहेलच्या घरी पोहोचले होते. सोबतच त्याची सावत्र आई हेलन यांनीही या पार्टीला हजेरी लावली. अर्पिता आणि अलविरा या त्याच्या बहिणीदेखील पती आणि मुलांसोबत येथे दाखल झाल्या.
सलमानच्या बर्थडे पार्टीचे काही इनसाइड फोटो समोर आले आहेत. यापैकी एका फोटोत सलमान त्याचा भाचा आणि अर्पिताचा मुलगा आहिलसोबत केक कापताना दिसतोय. तर आणखी एका फोटोत त्याने अभिनेत्री सौफी चौधरीसोबत पोज दिली आहे.
Happy Birthday @BeingSalmanKhan 🌟#HappyBirthdaySalmanKhan #HappyBirthdaySalman #HappyBirthdayBhaijaan pic.twitter.com/wELVJ5DrcQ
— Backchod Indian (@IndianBackchod) December 27, 2019
सलमानच्या बर्थडे पार्टीनिमित्त बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले होते. सलमानची गर्लफ्रेंड लुलिया वंतूर, कतरिना कैफ, डेजी शाह, सौफी चौधरी, उर्वशी रौतेला, प्रग्या कपूर, निर्माता निखिल द्विवेदी आणि त्याची पत्नी, रविना टंडन आणि तिचे पती अनिल थडानी, हुमा कुरैशी, साकिब सलीम, बॉबी देओल सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला पोहोचले होते. विशेष म्हणजे गुरुवार पासूनच त्याच्या चाहत्यांनी आपल्या लाडक्या भाईजानला शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला होता. तर काही ठिकाणी केक कापून सलमानच्या वाढदिवसाचा जल्लोषही केला होता. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर त्याच्या चाहत्यांनी आज सकाळपासूनच एक झलक बघण्यासाठी गर्दी केली आहे. काही चाहत्यांनी तर बॅंडस्टॅंडवरच केक कापून वाढदिवस साजरा केला.