मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९० वी जयंती आज बुधवार ( १९ फेब्रुवारी) साजरी होत आहे. या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी, राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सचिन तेंडुलकर, बीग बी अमिताभ बच्चन यांच्यासह जगभरातून शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जात आहे. शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यामुळं सोशल मीडिया शिवमय झाला आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
महाराष्ट्रातील तमाम जनतेला शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा pic.twitter.com/HliIb9iiHp
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 19, 2020
व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून जगभरातून शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जात आहे. शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यामुळं सोशल मीडिया शिवमय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भारताचा विश्वविक्रमवीर फलंदाज सचिन तेंडुलकर, यांच्यासह असंख्य नेते, अभिनेते,लेखक, कवी, पत्रकार, समाजसेवकांनी ट्विटरच्या माध्यमातून महाराजांना मानवंदना दिली आहे.
महान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांना नमन!
Bowing to one of the greatest sons of Mother India, the embodiment of courage, compassion and good governance, the exceptional Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti. His life continues to motivate millions. pic.twitter.com/zrnpT5D5oI
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2020
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (तारखेनुसार) आज संपूर्ण देशभरात साजरी होत आहे. त्या निमित्तानं ठिकठिकाणी मिरवणुका, बाइक रॅली व अन्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
प्राणाची बाजी लावून
स्वराज्यासाठी बेधडकपणे
लढणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांना मानाचा मुजरा.श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.#ShivajiMaharaj #ShivJayanti pic.twitter.com/l1tgvghEZ3
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 19, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ शिवनेरी किल्ल्यावर; शिवजन्म सोहळ्यात झाले सहभागी
छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान पराक्रम, कुशल रणनीती यांबरोबरच त्यांनी सर्वसामान्य रयतेच्या हितासाठी बसवलेल्या स्वराज्याच्या सर्वोत्तम प्रशासकीय घडीला जगात तोड नाही. जयंतीदिनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन! pic.twitter.com/wReIKsVpTV
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 19, 2020
महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून शिवाजी महाराजांना अभिवादन
T 3446 – ‘छत्रपति शिवाजी महाराज’, यह शब्द नहीं, मंत्र है। सदियों बाद भी उनसे प्रेरणा ही मिलती है। वह दुनिया के एक श्रेष्ठ योद्धा और आदर्श राजा थे। उनका स्मरण हमेशा प्रेरणादायी रहा है।
छत्रपति शिवाजी महाराज जी जयंती शत् शत् नमन।#ShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj pic.twitter.com/xtukepcFE8— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 19, 2020
शिवरायांसारख्या राष्ट्रपुरुषांकडून समस्त जनतेनं प्रेरणा घ्यावी. आपल्या मुलांना शिवरायांच्या जीवनाचे धडे द्यावेत – राज्यपाल कोश्यारी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवाजी पार्क, मुंबई येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केले . यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते. pic.twitter.com/cFFKDIZIJN
— Governor of Maharashtra (@maha_governor) February 19, 2020
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून शिवरायांना अभिवादन, शिवाजी पार्क येथील अश्वारुढ शिवपुतळ्याला केला पुष्पहार अर्पण
अदम्य साहस और पराक्रम के प्रतीक, छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं। #shivajimaharajjayanti pic.twitter.com/UMs61bPjnE
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 19, 2020
महाराष्ट्र सदनातील शिवजयंती सोहळ्याला ११ देशांचे राजदूत उपस्थित राहणार
शिवजयंती सोहळ्यासाठी नाशिक व पुण्यावरून ढोलपथकं दिल्लीला रवाना
राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातही शिवजयंती सोहळ्याचं खास आयोजन