Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेना पक्षप्रमुख मातोश्रीवर आमदारांना देणार गोड बातमी

शिवसेना पक्षप्रमुख मातोश्रीवर आमदारांना देणार गोड बातमी

Good news will given to MLAs on Matoshree by Shiv Sena party chief
मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्ष राज्यात सत्तास्थापन करणार आहेत जवळपास निश्चित झालं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार हे दोन्ही काँग्रेसमध्येही एकमत झालं. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मातोश्री निवासस्थानी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीत सेना आमदारांना गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईतील बैठकांचा सत्र तिन्ही पक्षांमध्ये संपला असून उद्या बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहेत. त्यानंतर हे नेते मुंबईत परतल्यानंतर सत्तास्थापन्यासाठी वेग येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी भेट घेतली. सत्तास्थापण्या बाबत जवळपास 45 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना सत्तास्थापनेवरून चर्चा झाली नाही अशी गुगली टाकून दिली. यामुळे माध्यमांमध्ये सत्तास्थापनेवरून जोरदार चर्चा रंगली.

आज शिवसेनेच्या मुख्यपत्रातून भाजपचा चांगलाच समाचार घेण्यात आला त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. राज्यात सत्तास्थापन्यावरून लवकरच प्रतिक्षा संपण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मातोश्रीवरच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments