Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रचारचाकी चालवणारे आपटले; उध्दव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

चारचाकी चालवणारे आपटले; उध्दव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

uddhav thackeray and devendra fadnavis

मुंबई : मला दुचाकी चालवण्याची सवय नाही, पण सध्या तीनचाकी कार नाही पण सरकार चालवतो. चारचाकी असूनही अनेकजण आपटले असा टोला शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

शिवसेनेनं भाजपपासून फारकत घेतली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं तेव्हापासून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून आरोप होत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर टीका करताना हे तीनचाकी सरकार असल्याचा वारंवार उल्लेख केला जातो. हे सरकार टिकणार नाही असा वारंवार दावा विरोधक करताना दिसतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या या टिकेला उत्तर दिलं आहे.

३१ व्या राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बोलत होते. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, “आमच्यावर तीनचाकी सरकार असल्याची टीका होत आहे. तीनचाकी तर तीनचाकी… पण आमचं सरकार चालत आहे ना हे महत्त्वाचं आहे. समतोल जमला पाहिजे मग दोन चाकं असो किंवा तीन चाकं असो”. चार चाकं असूनही आपटायचे ते आपटले आहेत असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. “जो चालवणारा असतो त्याच्या हातातील चाक महत्त्वाचं असतं. ते खरं नियंत्रण करत असतं. त्या चाकावर गाडी चालत असते. त्या चालवणाऱ्याला सगळे नियम सांगणं महत्त्वाचं,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी ‘ही’ केली होती टीका…

महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार तीनचाकी ऑटो रिक्षाप्रमाणे असल्याची टीका केली होती. इतका मोठा विरोधाभास असल्याचे सरकार राज्यात सत्तेत येणार आहे. दोन चाकं असणारं वाहन धावतं पण तीनचाकी ऑटो रिक्षाप्रमाणे असणाऱ्या या सरकारची चाकं तीन दिशेला धावली तर काय होईल?,” असा टोला त्यांनी लगावला होता.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments