Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकामाठीपु-यात चायना बिल्डींगला आग, आठ गंभीर

कामाठीपु-यात चायना बिल्डींगला आग, आठ गंभीर

Kamathipura,Nagpada,Mumbai,fireमुंबई : कामाठीपु-यारीत नागपाडा परिसरातील चायना बिल्डींगला भीषण आग लागली. या आगीमध्ये आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

या आगीत आदिल कुरेशी (वय २०), निशा देवी (वय ३२), चंदादेवी (वय ६०), अनिया (वय २), मोहनराम (वय ७०) जखमी झाले आहेत. त्यापैकी मोहनराम यांची प्रकृती गंभीर आहे. इतर जखमींचे नाव अद्यापही कळू शकले नाही.

नागपाडा येथील चायना बिल्डिंगला आज सोमवारी सकाळी आग लागली. या आगीत आठ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन वर्षीय चिमुकलीचा समावेश असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले.

Kamathipura nagpada,Kamathipura, nagpada, mumbai,fire
Image: ANI

नागपाडा येथील बगदादी कपांउंडमध्ये असलेल्या चायना बिल्डिंगमध्ये सकाळी आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, कामाठीपुरातील अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी दाखल होण्यास त्रास झाला. मात्र आगीच्या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड घबराहट निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments