Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यादेवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे बंडोखोरांना रोखण्यात फेल ; 30 जागांवर बंडाळी !

देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे बंडोखोरांना रोखण्यात फेल ; 30 जागांवर बंडाळी !

bjp-shiv-sena-devendra-fadnavis-uddhav-thackeray Alliance
बंडोबांना थंड करु अशी डरकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी दिली. मात्र, ३० विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीमध्ये बंडखोरी झाली. त्यामुळे ३० विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे. डा

बंडोबांचे आव्हान सर्वच पक्षात आहेत. यामुळे लढाया या चुरशीच्या होणार आहेत. जर राज्यातील ५० मतदारसंघात १४४ सर्वपक्षीय बंडखोरांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका शिवसेना-भाजप महायुतीला बसला आहे. राज्यात शिवसेना-भाजपची युती झाल्याने दोन्ही पक्षातील अनेक इच्छुकांना तिकीट मिळालेलं नाही. त्यामुळे दोन्ही पक्षातील अनेक इच्छुकांनी बंडाचं निशाण फडकावत उमेदवारी अर्ज भरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काही बंडखोरांना थोपविण्यात शिवसेना-भाजपला यश आले असले तरी एकूण ३० जागांवरील बंडखोरांचं मन वळविण्यात दोन्ही पक्षाला यश आलेलं नाही.

राज्यातील ३० जागांवर युतीला बंडखोरांचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यात मुंबईतील तीन जागांचाही समावेश आहे.

मुंबईत शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी वर्सोवा मतदारसंघातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. वर्सोवामधून विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या भारती लव्हेकर यांना निवडणूक लढवत आहेत. मात्र पटेल यांनी बंडखोरी केल्याने लव्हेकर यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. लव्हेकर यांचं वर्सोवामध्ये काहीही योगदान नाही. त्यांनी इथे काम केलेलं नाही, त्यामुळेच मी बंडखोरी केल्याचं पटेल यांनी सांगितलं.

तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेने सावंत यांचं तिकीट कापून या मतदारसंघातून महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना तिकीट दिलं आहे. महाडेश्वर हे शिवसेनेचे सचिव अनिल परब यांच्या जवळचे असल्यानेच सावंत यांचा पत्ता कापल्या गेल्याचं बोललं जातंय.

अंधेरी पूर्वमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सिंधुदुर्गात भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात लढत आहे. शिवसेनेचे सतीश सावंत यांनी भाजपचे उमेदवार नितेश राणेंविरोधात उमेदवारी अर्ज भरला आहे.

सावंतवाडीत भाजपचे कार्यकर्ते राजन तेली यांनी शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांच्याविरोधात उमेदवारी दाखल केली आहे.

कुडाळमध्ये भाजपचे रणजीत देसाई यांनी शिवसेनेचे उमेदवार आणि आमदार वैभव नाईकांविरोधात बंडाचा झेंडा फडकविला आहे.

रामटेकमध्ये शिवसेनेचे माजी आमदार आशिष जैस्वाल यांनी भाजपचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डींविरोधात उमेदवारी अर्ज भरला आहे.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचीही शिवसेनेच्या बंडखोरामुळे डोकेदुखी वाढली आहे. बागडे यांच्या विरोधात सेनेच्या रमेश पवार यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

औरंगाबादेत पश्चिम मतदारसंघात शिवसेनेच्या संजय शिरसाट विरोधात भाजपचे राजू शिंदे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments