Placeholder canvas
Wednesday, May 8, 2024
Homeदेशदिल्ली दंगल पूर्वनियोजित; आयोगाचा ठपका

दिल्ली दंगल पूर्वनियोजित; आयोगाचा ठपका

Delhi Jafrabad Violence,Delhi Jafrabad, Violence,Delhi, Jafrabad Violenceनवी दिल्ली : देशीची राजधानी दिल्लीमध्ये दंगल उसळली होती. त्यामध्ये ५४ जणांचे जीव गेले. २५० पेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी झाले. हजारो मालमत्तांचे नुकसान झाले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या ईशान्य दिल्लीतील दंगल एकतर्फी आणि सुनियोजित होती असा खळबळजनक दावा दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आला आहे.

आयोगाने दिल्ली दंगलीबाबतचा आपला ‘फॅक्ट फाइंडिंग’ अहवाल प्रसिद्ध केला. भारतीय जनता पक्षाचे नेते कपिल मिश्रा यांनी दिलेल्या चिथावणीखोर भाषणानंतर ईशान्य दिल्ली परिसरात हिंसाचार भडकला. या हिंसाचारात मुस्लीम धर्मियांच्या घरांचे आणि दुकानांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. खजुरी खास परिसरातील लोकांनी ही माहिती दिल्याचेही आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर आयोगाने भाजप नेते कपिल मिश्रा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयोगाचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही,असे आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

फॅक्ट फाइंडिंग अहवाल दोन पानांचा

दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचा हा फॅक्ट फाइंडिंग अहवाल दोन पानांचा आहे. दंगलीच्या काळात अधिकाधिक नुकसान व्हावे या उद्देशाने गॅस सिलेंडरचा वापर करण्यात आला होता. या बरोबरच ईशान्य दिल्लीत घरांचे आणि दुकानांचे नुकसान करत असताना दंगलखोरांनी लूटही माजवली होती, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांचे अहवालात कौतुक…

दिल्ली हायकोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढले असले तरी देखील अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालात दिल्ली पोलिसांचे कौतुक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दंगलीनंतर पोलिसांचे बरेच व्हिडीयो सोशल मीडियावर छळकले होते. त्यामध्ये पोलीस दंगलखोरांसोबत दगडफेक करत होते. काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड करत होते. असे दिसून आले होते.

आर्थिक मदत तुटपुंजी

दंगलपीडितांना सरकारकडून देण्यात येत असलेली आर्थिक मदत तुटपुंजी असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही मदत वाढवण्याची गरज असल्याचेही अहवालात म्हटले आहे. पीडित कुटुंबांना भरीव मदत दिल्या खेरीज ही कुटुंबे पुन्हा उभी राहू शकणार नाहीत, असेही अहवालात म्हटले आहे.

चांद बाग, जाफराबाद, ब्रिजपुरी, गोकुळपुरी, मुस्तफाबाद, शिवविहार, खजुरा, यमुना विहार आणि भजनपुरा परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी घरे, दुकानांबरोबरच शाळा आणि मशिदींचीही पाहणी केली. ईशान्य भागातील दंगलग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर अल्पसंख्याक आयोगाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. आयोगाचे सदस्य करतार सिंह कोचर यांनी दंगलग्रस्त भागाचा दौरा केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments