Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांची घेणार भेट

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांची घेणार भेट

ncp congress  Governor
मुंबई : युतीला मतदारांनी कौल दिल्यानंतरही सरकार स्थापन झालं नाही. राज्यात ओला दुष्काळ पडला असून शेतकरी हवालदील झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस महाआघाडीचे नेते राज्यपाला भगतसिंह कोश्यारींची आज भेट घेणार आहे. मात्र, अद्यापही शिष्टमंडळाला वेळ मिळाला नाही.

विधानसभेचा निकाल लागून 13 दिवसाचा अवधी लोटला आहे. शिवसेना भाजपला मतदारांनी कौल दिला. मात्र, युतीमध्ये सत्तेच्या समसमान वाटपावरून संघर्ष कायम आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. पिकांचे पंचनामे झाले नाही. शेतक-यांवर आत्महत्येची वेळ आली. मात्र, राज्यात काळजीवाहू सरकार असून शेतकरी हवालदील झाला आहे.

या सर्व घटना लक्षात घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,राष्ट्रवादी काँग्रेस प्रेदशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण,खासदार सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार या सर्व नेत्यांचा शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments