Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईपुढील पंधरा दिवस महाराष्ट्रासाठी महत्वाचे : उध्दव ठाकरे

पुढील पंधरा दिवस महाराष्ट्रासाठी महत्वाचे : उध्दव ठाकरे

Meeting of Uddhav Thackeray and Shiv Sena MPs at Matoshreeमुंबई : कोरोनामुळे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. पार्क मॉल, बिचेसवर जाऊ नका. सर्वांनी काळजी घेण्याची गरज असून पुढचे पंधरा दिवस आपल्यासाठी मह्त्वाचे आहेत. जेवढया सुविधा आहेत तेवढ्या आपण देत आहोत. असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील सर्व यात्रा, जत्रा, रद्द कराव्यात गर्दी करु नये. असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची संख्या ३९ वर पोहोचली आहे. मात्र रुग्णांची प्रकृती खालावली नाही अशीही माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आहे. कोरोनाबाबत रेल्वे, बसच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येईल. तसेच रेल्वे,बसमध्ये साफसफाई बाबत सर्व अधिका-यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

अद्यापही रेल्वे, बससेवा बंद करण्यात आली नाही.  सर्व शाळा, मॉल बंद करण्यात आल्या आहेत. हे जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे. सर्व यात्रा, राजकीय कार्यक्रम टाळले पाहिजेत. कारण पुढचे पंधरा दिवस महत्वाचे आहेत. असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments