मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे.
विधानपरिषद सदस्य म्हणून निवडीचे प्रमाणपत्र विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडून स्वीकारताना मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे. सोबत विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत, श्रीमती रश्मी ठाकरे. pic.twitter.com/tATb8d0QJ2
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 18, 2020
विधीमंडळात हा शपथविधी पार पडला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बिनविरोध निवडून आलेल्या इतर आठ उमेदवारांनाही आमदारकीची शपथ घेतली.
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. pic.twitter.com/F29nb0mDRP
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) May 18, 2020
राज्यावर करोनाचं संकट असल्याने नेहमीप्रमाणे भव्य कार्यक्रम न घेता विधीमंडळात साधेपणाने हा शपथविधी पार पडला.
उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरुन राज्य सरकारसमोर मोठा पेच उभा राहिला होता,पण उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्याने महाविकास आघाडीने सुटकेचा निश्वास सोडला होता.