Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेमनसेच्या मोर्चासाठी ‘या’ भाजप आमदाराच्या गाड्या

मनसेच्या मोर्चासाठी ‘या’ भाजप आमदाराच्या गाड्या

Mahesh Landge MNS,Mahesh Landge, MNS,Mahesh, Landge

पिंपरी-चिंचवड : मनसेनं आज रविवार (९ फेब्रुवारी) महामोर्चाचे आयोजन करुन शक्तीप्रदर्शन केलं. मात्र, मोर्च्यामध्ये सहभागी होण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांना भोसरी मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी वाहनं पुरवल्याची चर्चा आहे. परंतु आमदार महेश लांडगे यांनी स्पष्टीकरण दिलं. भाजपचा मोर्चाशी काहीही संबंध नाही. माझा वाहतुकीचा व्यवसाय आहे. माझी वाहनं घेऊन गेले असावेत. असं महेश लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

मनसे आणि भाजपची युती होणार अशी चर्चा सुरु असताना भाजप आमदाराने गाड्या पुरविल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांनी मनसे ही भाजपची बी टीम बनली असा आरोप केला होता. आता भाजप आमदाने मोर्चेक-यांनी गाड्या दिल्या त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. महेश लांडगे म्हणाले, माझा वाहतुकीचा व्यवसाय आहे. मी कंपन्यांना बस पुरवत असतो. आज रविवार असल्याने त्या गाड्या मनसेच्या कार्यकर्त्यांना दिल्या असतील. त्यामुळे माझी वाहनं हे कार्यकर्ते घेऊन गेले असतील. कार्यक्रमासाठी माझ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या कुणी वापरत असेल, तर माझी त्याला हरकत नाही. त्या काही भाजपच्या गाड्या नाहीत. तो माझा वैयक्तिक व्यवसाय आहे”, असे स्पष्टीकरण भाजप आमदार महेश लांडगे यांनी दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments