Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याभाजप नेते एकनाथ खडसे शिवसेनेच्या वाटेवर

भाजप नेते एकनाथ खडसे शिवसेनेच्या वाटेवर

eknath khadse criticizes bjp devendra fadnavis after exiting powerमुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे पक्षात नाराज आहेत. खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी दिल्लीत भेट घेतली. खडसे मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यानंतर खडसे शिवसेना प्रवेशाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसेंनी आज माजी मंत्री पंकजा मुंडेंची भेट घेतली. दोन तास दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर बोलतांना खडसे म्हणाले की, मला भाजपने कोअर कमिटीमधून पूर्वीच काढून टाकण्यात आले आहेत. मी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट घेणार आहे असे स्पष्ट केले. तसेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुध्दा माध्यमांशी बोलताना सांगितले की मी एकनाथ खडसेंना जरूर भेटेल. त्यांचे आमचे जुने संबंध आहेत. त्यामुळे खडसे हे शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित असल्याची चर्चा आहे.

खडसेंच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसेंचा पराभव झाल्यानंतर खडसे संतप्त झाले आहेत. खडसेंना पक्षाने तिकीट न देता बाजूला केले, त्यानंतर मुलीला तिकीट दिले. भाजपच्या मंडळींनी विरोधात काम केले. असा आरोप खडसेंनी केला आहे. त्याचे पुरावे पक्षश्रेष्ठीला दिले आहेत असे खडसेंनी जाहीरपणे सांगितले. जाणीवपूर्वक पक्षातून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही मी यांची आरती करावी काय? परंतु वारंवार असाच अन्याय होत राहिल्यास मला पक्षाबाबत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा खडसे यांनी दिला होता. त्यामुळे खडसे भाजपला रामराम ठोकतील हे स्पष्ट झालं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments