Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनबिग बॉस : जसलीन मथारूचे कन्यादान करणार अनुप जलोटा

बिग बॉस : जसलीन मथारूचे कन्यादान करणार अनुप जलोटा

Jasleen Mathur Anup Jalota,Jasleen Mathur, Anup Jalota,Jasleen, Mathur, Anup, Jalota,Bigg Bossमुंबई : भजन सम्राट अनुप जलोटा आणि जसलीन मथारू दोघेही गेल्या वर्षी बिग बॉसद्वारे खूप चर्चेत राहिले. आता जसलीनचे लग्न होणार असून अनुप तिचे कन्यादान करण्यासाठी तयार आहेत.

अनुप जलोटा म्हणाले, मी जसलीनसाठी कन्यादान करेल. ती माझ्या मुलीसारखी आहे. कुणी माझ्याबद्दल काय म्हणेल, याची मला परवा नाही. साधू-संत आदरणीय असतात, पण मी साधू नाही. तर मी आपल्या कामाची साधना करतो. मी जसलीनसोबत एक चित्रपटही करत आहे, यात जसलीन माझी विद्यार्थिनी असेल. मी तिला संगीताचे शिक्षण देत एक आर्टिस्ट बनवतो.’

मी केवळ संगीतामुळे युवकांमध्ये लोकप्रिय झालो आहे. शाळकरी मुले व युवक मला बिग बॉसमध्ये पाहिल्यानंतर भजन ऐकतील. मेनस्ट्रीम शोमध्ये भाग घेतल्यानंतर आता युवकांशी थेट संवाद साधत आहे. शोच्या माध्यमातून नवीन प्रेक्षक तयार करता येतात. मोठ्या कष्टाने मी हे यश मिळवले आहे. असेही अनुप जलोटा म्हणाले. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments