Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्रीपदासाठी मातोश्रीवर आज ठरणार अजेंडा !

मुख्यमंत्रीपदासाठी मातोश्रीवर आज ठरणार अजेंडा !

uddhav thackeray shivsena cm seat
मुंबई : मुख्यमंत्रीपद तसेच सत्तेतील समसमान वाटा यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी सर्व नवनिर्वाचित आमदारांची मातोश्रीवर आज दुपारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेना त्यांचा पुढचा अजेंडा ठरवणार आहे.

लोकसभेत आम्ही भाजपच्या अडचणी समजून घेतल्या होत्या. प्रत्येक वेळी शिवसेना तडजोड करणार नाही. शेवटी आम्हालाही आमचा पक्ष वाढवायचा आहे. असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी गुरुवारीच भाजपला दिला होता. त्यामुळे शिवसेना आता 50- 50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम आहेत. त्यानुसार शिवसेनेला आता सत्तेत वाटा हवा आहे. 2014 मध्ये शिवसेनेला भाजपाकडून मंत्रीमंडळात दुय्यमस्थान मिळाले होते. शेवटपर्यंत शिवसेनेनेही राजीनामे खिशात असल्याची धमकी देत सत्तेत कायमं राहिले होते.

मात्र, अबकी बार 220 पार ची घोषणा देणा-या भाजपाला धक्का बसला. जागा कमी निवडूण आल्या. शिवसेनेनेही अबकी बार 100 पार अशी घोषणा दिली होती. परंतु, त्यांच्या जागाही कमी झाल्या. भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येत नाही त्यामुळे हीच ती वेळ म्हणून शिवसेनाही आता मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार असून त्या बाबत ते पुढील निर्णय घेणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments