Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईबापरे : पोलिसांच्या ८ हजार जागांसाठी १२ लाख अर्ज!

बापरे : पोलिसांच्या ८ हजार जागांसाठी १२ लाख अर्ज!

Police Bandobast Police Recruitment,Police Bandobast, Police Recruitment,Police, Bandobast, Recruitment,Police Training,Training,POlice Bharti,Mumbai Police, maharashtra Policeमुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकार  पोलिसांच्या ८ हजार जागा भरणार आहे. त्यासाठी १२ लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे १ जागेसाठी १५० उमेदवार अशी स्पर्धा राहणार आहे. या आकडेवारीवरून बेरोजगारीचे प्रमाण किती प्रमाणात वाढले हे स्पष्ट होते.

महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वात मोठी भरती पोलीस दलात होत आहे. त्यासाठी गृहविभागाने ८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. त्यासाठी १२ लाख अर्ज आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असल्याचे स्पष्ट होत आहे. या पोलीस भरतीमुळे राज्यातील पोलिसांवरील ताण काही प्रमाणात कमी होईल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं. पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परिक्षांसाठी ग्रामीण भागातील तरुणांनी अभ्यासात सातत्य ठेवत तयारी करायला हवी असेही मत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments