Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनश्रद्धा कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत?

श्रद्धा कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत?

Shradha Kapoorसध्या बॉलिवूडमध्ये लग्न साराईचा मौसम सुरु आहे. सोनम कपूर आणि आनंद अहुजा पुढच्या महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे तर  दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगसुद्धा याच वर्षी लग्न करतील असा अंदाज बांधण्यात येतो आहे. याच सगळ्या चर्चा रंगलेल्या असताना अभिनेत्री श्रद्धा कपूरनेसुद्धा फेसबुकवर पिवळ्या रंगाच्या लंहग्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोनंतर फॅन्सने श्रद्धाचे लग्न यावर्षी होणार असे स्वप्न बघायला लागले आहेत. श्रद्धाने या फोटोला एक कॅप्शनदेखील लिहिले आहे, या वर्षाच्या सगळ्यात मोठ्या हळदीच्या कार्यक्रमाची तयारी सुरु आहे.

श्रद्धाच्या या फोटोमुळे एक असा प्रश्न उपस्थित झाला आहे की खरंच या वर्षी श्रद्धा लग्न करते आहे का ? जर उत्तर हो आहे तर ती व्यक्ति मग कोण आहे ?, यावर्षी आणखीन एका कपूर कुटुंबीयांच्या घरी सनई चौघडे वाजणार का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर फक्त श्रद्धाच देऊ शकते. बॉलिवूडमध्ये सध्या वेडींग सीझन चालू आहे. नुकतेच अभिनेता -मॉडल मिलिंद सोमण आपली गर्लफ्रेंड अंकितासोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे.
श्रद्धाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती शाहिद कपूरसोबत बत्ती गुल मीटर चालूमध्ये स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा चित्रपट वीज चोरीवर आधारित आहे. वीज कंपनीच्या पायºया झिजवणाºया सामान्य माणसाची कथा यात दिसणार असल्याचे कळते.  श्रद्धा यात एका खास पद्धतीच्या एक्सेंटमध्ये बोलताना दिसणार आहे. श्रीनारायण सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला हा चित्रपट यावर्षी ३१ आॅगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच श्रद्धा साहोमध्ये साऊथचा सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहे. यानंतर ती ‘स्त्री’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात श्रद्धासोबत राजकुमार रावची ही मुख्य भूमिका आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments