Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनमाहिरा खानने कसा सोडवला पिच्छा!

माहिरा खानने कसा सोडवला पिच्छा!

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. पण आम्ही आधीच स्पष्ट करू इच्छितो की, यावेळी माहिराच्या या व्हिडिओचा अन् बॉलिवूडचा काहीही संबंध नाहीये. नाही म्हणायला,यापूर्वी रणबीर कपूरसोबतच्या व्हायरल फोटोंमुळे माहिरा चर्चेत आली होती. पण या ताज्या व्हिडिओत तिच्यासोबत रणबीर वा अन्य कुणीही बॉलिवूड अभिनेता नसून तिचा पाकिस्तानी सहअभिनेता आहे. होय, पाकिस्तानी अभिनेता जावेद शेख या व्हिडिओत दिसतो आहे. या व्हिडिओत जावेद शेख काहीशा बळजबरीने माहिराच्या गालांचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करताना दिसतोय तर माहिरा त्याच्यापासून स्वत:चा पिच्छा सोडवताना दिसतेय. होय, अलीकडे एका अवार्ड शोमध्ये माहिराला या अवघडलेल्या स्थितीचा सामना करावा लागला.

एका अवार्ड सोहळ्यात ‘वरना’ या चित्रपटासाठी माहिराला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. माहिरा पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आली. जावेद आधीच स्टेजवर होता. पुरस्कार स्वीकारल्यानंतर माहिरा हस्तांदोलनासाठी जावेदकडे वळली. पण जावेदने अचानक माहिराला जवळ ओढत, तिच्या गालाचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. माहिराला  ही गोष्ट अजिबात आवडली नाही आणि तिने जावेदकडे अक्षरश: दुर्लक्ष करत, स्टेजवरून काढता पाय घेतला. या क्षणांचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.
मध्यंतरी माहिरा व रणबीरचे एकत्र स्मोकिंग करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंनी खळबळ उडवून दिली होती. या फोटोनंतर रणबीर व माहिरा दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत, अशी चर्चा सुरु झाली होती.  या फोटोंमध्ये रणबीर कपूर व माहिरा खान दोघेही स्मोकिंग करताना दिसले होते. माहिरा यात एका शॉर्ट  बॅकलेस ड्रेसमध्ये होती. शिवाय तिच्या शरिरावर काही ‘लव्ह बाईट्स’ही कॅमेºयाने टिपले होते.   हे फोटो आणि माहिराच्या पाठीवरचे हे ‘लव्ह बाईट्स’ यानंतर जितका काय तो बोभाटाही झाला होता. पाकिस्तानी जनतेने तर माहिराला जाम फैलावर घेतले होते. ‘शर्म से मर जाओ, पाकिस्तान से दफा हो जाओ. शॉर्ट ड्रेस उपर सिगरेट. तुम जैसी पाकी कलाकार पाकिस्तान को बदनाम करते है,’ अशा प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments