Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनद कपिल शर्मा शो' परत येतोय

द कपिल शर्मा शो’ परत येतोय

कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा नव्या जोमाने छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज झालाय. द कपिल शर्मा शोचं दुसरं सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१८ मध्ये कपिलच्या या कॉमेडी शोचं नवं रुप त्याच्या चाहत्यांना पाहता येईल.

कपिल या कॉमेडी शोच्या सध्या जोरदार तयारीला लागलाय. एवढंच नव्हे तर लवकरच कपिल शोच्या दुसऱ्या सीझनचं प्रोमो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शूट देखील करणार आहे. कपिलचा चाहतावर्ग फारच मोठा असल्याने त्याचा हा नवा शो कसा असेल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली. ‘द कपिल शर्मा’च्या पहिल्या सीझनमध्ये काहीच नवे बदल होत नसल्याने कपिलने काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. तसंच कपिल आणि सुनिल ग्रोवर मध्येही यादरम्यान मतभेद निर्माण झाले. मात्र आता या नव्या सीझनमध्ये शोचा कायापालट होताना दिसणार आहे. शोच्या या नव्या सीझनमध्ये नक्की कोण कोणते कलाकार झळकणार हे अजुनही गुलदस्त्यातच ठेवण्यात आलंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments