Thursday, September 12, 2024
Homeमनोरंजनप्राजक्ता माळीचे हे सोज्वळ सौंदर्य तुम्हालाही करेल घायाळ

प्राजक्ता माळीचे हे सोज्वळ सौंदर्य तुम्हालाही करेल घायाळ

रॉकिंग आणि स्टनिंग स्टाईलसह चेह-यावरील घायाळ करणारे स्माईल यामुळे प्राजक्ताच्या या फोटोंचीही सोशल मीडियावर खुमासदार चर्चा रंगली आहे. प्राजक्ता माळी तिच्या अभिनयामुळे अल्पावधीत रसिकांची लाडकी बनली. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.

जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहचली. याआधीही तिने सुवासिनी, बंध रेशमाचे, गाणे तुमचे आमचे, सुगरण अशा मालिकांमध्ये काम केलं होतं. खो-खो, संघर्ष, गोळाबेरीज अशा मराठी सिनेमांमध्येही प्राजक्ताने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या प्राजक्ताची नकटीच्या लग्नाला यायचं हं, ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली. या मालिकेतील प्राजक्ताचा खट्याळ अंदाज आणि पारंपरिक लूक रसिकांना चांगलाच भावला.प्राजक्ताने नुकताच एक फोटो शेअर केला आहे.त्या फोटोत प्राजक्ताचा सोज्वळ सौदर्य पाहायला मिळत आहे.तिच्या हा फोटो शेअर करताच तिला अनेक लाईक्स आणि कमेंटस मिळत आहेत.तिच्या इतर अंदाजातील फोटोंप्रमाणे हा फोटोही तुम्हाला घायाळ करेन असाच आहे.मराठमोळ्या घरातील मराठमोळी मुलगी साकारणारी प्राजक्ता रसिकांची फेव्हरेट बनली  याआधी विविध मालिकांमध्येही प्राजक्ता माळीचा मराठमोळा लूक रसिकांना भावला होता. पारंपरिक साडीतील तिचा मराठमोळा लूक रसिकांवर जादू करुन गेला. कधी ड्रेस घालून फेटा परिधान करुन तिने रसिकांची मनं जिंकली. तिचा पारंपरिक अंदाज तिच्या फॅन्सना आवडला. तिच्या पारंपरिक लूकची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा तिच्या बोल्ड, हॉट आणि सेक्सी अंदाजाचीही झाली.

‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ ही मालिका छोट्या पडद्यावरुन लवकरच रसिकांचा निरोप घेणार आहे.या मालिकेच्या जागी आता नवी मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे. ८ नोव्हेंबरपासून ‘हम तो तेरे आशिक हैं’ ही मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेचे प्रोमो सध्या झळकत आहेत. या प्रोमोमध्ये अभिनेता पुष्कर श्रोत्रीचा आवाज ऐकायला मिळत आहे. या मालिकेत पुष्करची काय भूमिका असणार याची रसिकांना उत्सुकता लागली आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी सिनेमा दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरु केली होती. त्याने दिग्दर्शित केलेला उबुंटू हा सिनेमा रसिकांना भावला. आता मोठ्या पडद्यानंतर पुष्कर हम तो तेरे आशिक हैं या मालिकेतून रसिकांच्या भेटीला येणार का हे ८ नोव्हेंबरला स्पष्ट होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments