सूरज पांचोलीच्या चित्रपटाबद्दल सध्या कुठलीही बातमी नाही. बातमी आहे ती त्याच्या पर्सनल लाईफबद्दल. होय, सध्या सूरज एका अभिनेत्रीसोबत वारंवार दिसतो आहे. आता एखाद्या मुलीसोबत वारंवार दिसणे, याचा अर्थ आपण ‘डेट’ असा घेतो. तर सध्या हीच चर्चा आहे. सूरज या अभिनेत्रीला डेट तर करत नाहीयं ना? यावरून सध्या तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
आता ही अभिनेत्री कोण तर कियारा अडवाणी. होय, गत सोमवारी सूरज व कियारा दोघेही एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले. दोघेही कॅज्युअलमध्ये दिसले. कियाराने पिंक कलरचा जंपसूट घातलेला होता तर सूरज ब्लॅक लोअर आणि ब्ल्यू टी शर्टमध्ये होता. आता ही अभिनेत्री कोण तर कियारा अडवाणी. होय, सोमवारी सूरज व कियारा दोघेही एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले. दोघेही कॅज्युअलमध्ये दिसले. कियाराने पिंक कलरचा जंपसूट घातलेला होता तर सूरज ब्लॅक लोअर आणि ब्ल्यू टी शर्टमध्ये होता.
नाही म्हणायला या दोघांनी एकत्र एक सिनेमा साईन केला आहे. पण तरिही अलीकडे यांच्या गाठीभेटी जरा जास्तच वाढल्या आहेत. गत महिन्यातही हे दोघे एकत्र दिसले होते. यावरून या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त काही असल्याची चर्चा होऊ लागली आहे. खरे तर यापूर्वी सूरज एका मिस्ट्री गर्लसोबतही दिसलेला आहे. पण कियाराची बातच वेगळी आहे. बॉडी लँग्वेज बघता, दोघेही एकमेकांसोबत अतिशय कम्फर्टेबल असल्याचे दिसताहेत.
सूरजने ‘हिरो’मधून बॉलिवूड डेब्यू केले होते. ( हा चित्रपट जॅकी श्रॉफ यांच्या ‘हिरो’ या गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक होता.) यामागे सलमान खानची पुण्याई होती. पण सलमानची ही पुण्याई सूरजच्या फार कामी आली नाही. कारण ‘हिरो’दणकून आपटला. त्याचमुळे सूरज आजही आपल्या पुढील चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा करतो आहे. अलीकडे सलमानला सोडून सूरज बॉलिवूडच्या दुसºया कंपूत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची बातमी होती .होय, हा कंपू आहे रणबीर कपूरचा. रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर, वरूण धवन, अर्जुन कपूर हे सगळे बॉलिवूडच्या एका कंपूचा भाग आहेत. हे सगळे एकत्र फुटबॉल खेळतात. आता सूरजलाही या कंपूत सामील होण्याचे वेध लागले आहेत. यामागे सूरजची दूरदृष्टी आहे. आता ही दूरदृष्टी काय, याचा अंदाज तुम्हीही बांधू शकता. बॉलिवूडच्या या यंग अॅण्ड हॅण्डसम गँगमध्ये प्रवेश म्हणजे, प्रसिद्धी आणि लोकप्रीयता. करिअरच्या या टप्प्यावर सूरज नेमके हेच हवे आहे. त्याचमुळे ही गँग जॉईन करून लाईमलाईटमध्ये येण्याचे सूरजचे प्रयत्न आहेत.