Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशसुप्रीम कोर्टाचा निर्णय, श्रीदेवींच्या मृत्यूची चौकशी नाही

सुप्रीम कोर्टाचा निर्णय, श्रीदेवींच्या मृत्यूची चौकशी नाही

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या रहस्यमयी मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी अशी याचिका फिल्ममेकर सुनील सिंह यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. श्रीदेवींच्या दुबईतील हॉटेलमध्ये झालेल्या मृत्यूप्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलीये. हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. ५४ वर्षी अभिनेत्री श्रीदेवींच्या अचानक जाण्याने संपूर्ण बॉलीवूड विश्वाला धक्का बसला होता. त्यांच्या अचानक मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित होत होते. मात्र तपासाअंती त्यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचे निष्पन्न झाले. 

न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती एए खानविलकर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सुनील सिंह यांची याचिका फेटाळून लावली. याआधी दिल्ली उच्च न्यायालयानेही श्रीदेवींच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशीची मागणी करणारी याचिका ९ मार्चला फेटाळून लावली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments