Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeदेशश्रीदेवी पहिल्यांदा हॉटेल स्टाफला बेशुद्धावस्थेत दिसल्या?

श्रीदेवी पहिल्यांदा हॉटेल स्टाफला बेशुद्धावस्थेत दिसल्या?

मुंबई: अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. शनिवारी संध्याकाळी ह्रदय विकाराच्या झटक्याने श्रीदेवी यांचं निधन झालं. श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेक प्रकारचे दावे समोर येत आहेत. पती बोनी कपूर यांना श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्धावस्थेत पडलेली आढळल्या, असं वृत्त आधी समोर आलं. पण आता हॉटेल स्टाफकडून गंभीर दावा केला जातो आहे. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी श्रीदेवी यांना बाथरूममध्ये पडलेलं पाहिलं व त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्याचं वृत्त ‘पिंकविला’ने दिलं आहे.

हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी अनेकदा रूमची बेल वाजवून श्रीदेवी यांनी प्रतिसाद दिला नाही. नंतर कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडल्यावर त्यांना श्रीदेवी बाथरूममध्ये पडलेल्या दिसल्या. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास श्रीदेवी यांनी रूम सर्व्हिसला फोन करून पाणी मागितलं. हॉटेल स्टाफ १५ मिनिटांनी पाणी घेऊन श्रीदेवी यांच्या रूममध्ये पोहचला. अनेकदा रूमची बेल वाजवूनही श्रीदेवी यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आत काहीतरी झालं असावं, असा विचार करून हॉटेल स्टाफने दरवाजा तोडला. तेव्हा श्रीदेवी बाथरूममध्ये पडलेल्या स्टाफला दिसल्या. रात्री ११ वाजेच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी श्रीदेवी यांना पाहिलं तेव्हा त्यांच्या ह्रदयाचे ठोके सुरू होते. श्रीदेवी त्यावेळी हॉटेलमध्ये एकट्याच होत्या, असा दावा केला जातो आहे. हॉटेलमधील सुत्रांनी दुबईतील एका प्रसिद्ध वृत्तपत्राला ही माहिती दिली. श्रीदेवी यांना बाथरूममध्ये पडलेलं पाहिल्यावर आम्ही त्यांना राशीद हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण तेथे गेल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आलं, असंही सुत्रांनी सांगितलं.

दरम्यान, पती बोनी कपूर यांच्याबरोबर डिनर डेटवर जाण्यासाठी श्रीदेवी तयार व्हायला बाथरूममध्ये गेल्यावर त्याना कार्डिअॅक अरेस्टचा झटका आल्याचं वृत्त खलिज टाइम्सने दिलं आहे. कुटुंबीयाच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न सोहळ्यानंतर मुंबईला परतलेले बोनी कपूर २४ फेब्रुवारी रोजी सध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पुन्हा दुबईत पोहचले. श्रीदेवी यांना त्यांच्या स्वप्नातील सरप्राईज डिनर डेटवर घेऊन जाण्यासाठी बोनी कपूर पुन्हा दुबईला गेले. बोनी कपूर दुबईतील जुमैरा एमिरेट्स टॉवरमधील श्रीदेवी यांच्या रूममध्ये पोहचल्यावर त्यांनी श्रीदेवी यांना उटवलं. त्यानंतर दोघांनी १५ मिनिटं गप्पा मारल्या. गप्पांच्या ओघात बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना डिनर डेटसाठी विचारलं. डिनरला जायला तयार होण्यासाठी श्रीदेवी वॉशरूममध्ये गेल्या. जवळपास १५ मिनिटं त्या आतच होत्या. बराच वेळ होऊनही श्रीदेवी बाहेर न आल्याने बोनी कपूर यांनी दरवाजा वाजवला. पण आतून काहीही प्रतिसाद न आल्याने त्याने वॉशरूमचा दरवाजा तोडला. तेव्हा पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये श्रीदेवी बेशुद्धावस्थेत होत्या. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला व तरीही त्या शुद्धीवर न आल्याने बोनी कपूर यांनी मित्रांला फोन केला. रात्री नऊ वाजता यासंदर्भातील माहिती पोलिसांना समजली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments