Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमनोरंजनहि अभिनेत्री पाच वर्षांनी लहान ‘अभिनेत्या’शी लग्नगाठ बांधणार!

हि अभिनेत्री पाच वर्षांनी लहान ‘अभिनेत्या’शी लग्नगाठ बांधणार!

chaitanya sharma

‘मसान’,‘हरामखोर’ यासारख्या चित्रपटांत जिवंत अभिनय साकारून सगळ्यांची प्रशंसा मिळवणारी अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. होय, अनेकांच्या मनावर राज्य करणारी ही प्रतिभावान अभिनेत्री लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. अभिनेता आणि रॅपर चैतन्य शर्मा याच्यासोबत श्वेता लग्नगाठ बांधणार आहे. चैतन्य शर्मा हा स्लो चीता नावाने ओळखला जातो. चैतन्य हा श्वेतापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. श्वेता ही ३२ वर्षांची आहे. अर्थात चैतन्यच्या मते, ३२ व्या वर्षीही श्वेता बरीच तरूण दिसते.

अलीकडे एका मुलाखतीत, श्वेताने स्लो चीताच्या रोमॅन्टिक प्रपोजलबद्दल सांगितले होते. ‘ते प्रपोजल प्रचंड रोमॅन्टिक होते. कुक्कू कल्ब या मुंबईतील एका परफॉर्मिंग स्टेजवर त्याने मला प्रपोज केले होते. कारण आम्ही एका स्टेजवरचं पहिल्यांदा भेटलो होतो. त्यामुळे त्याला मला स्टेजवरचं प्रपोज करायचे होते,’असे तिने सांगितले. हे प्रेम कसे फुलत गेले, हेही तिने सांगितले. एकदा मी व चैतन्य आम्ही दोघेही मुंबईवरून दिल्लीला जात होतो. जातांना आम्ही फार बोललो नाही. पण परततांना फ्लाईटमध्ये आम्ही एकमेकांच्या आजूबाजुला होतो. फ्लाईट पहाटे पाच वाजताची होती. आम्हाला झोपायचे होते. पण आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि आम्ही झोप विसरलोत. यानंतर गप्पांचा हा ‘सिलसिला’ असाच सुरू राहिला आणि आम्ही कधी प्रेमात पडलो ते कळलेच नाही, असे श्वेता म्हणाली. श्वेता व चैतन्यच्या लग्नाबद्दल सांगायचे तर, हे लग्न गोव्यात होणार आहे. अतिशय जवळचे मित्र व कुटुंबीयांच्या उपस्थितीत हे लग्न होईल. दिल्लीचे माजी मुख्य सचिव पी. के. त्रिपाठी यांची मुलगी असलेली श्वेता सुमारे एक दशकापूर्वी मुंबईत आली होती. पण तिला बॉलिवूडची अभिनेत्री बनण्यात रस नव्हता तर रंगभूमीवर तिला तिची ओळख निर्माण करायची होती. थिएटर हेच श्वेताचे पहिले प्रेम होते. अर्थात थिएटर करता करता श्वेताला मोठ्या पडद्यावरही संधी मिळाली. सर्वप्रथम डिज्नी चॅनलवर ‘क्या मस्त है लाईफ’ या शोमध्ये ती दिसली. यानंतर शॉर्ट फिल्म्स आणि अनेक जाहिरांतीत झळकली. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘हरामखोर’ या चित्रपटांतून श्वेता डेब्यू करणार होती. पण त्याआधी तिचा ‘मसान’ हा चित्रपट रिलीज झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments