मुंबई – काही दिवसांपासून शाहिद कपूर आपला चेहरा लपवत होता. मुंबई विमानतळावर त्याने आपला चेहरा रुमालने आणि टोपीने झाकला होता. शाहिदला पाहिल्यानंतर तो नव्या चित्रपटाच्या लूकसाठी धडपडत असल्याचे दिसत होते.
शाहिदने पत्नी मीरासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्या पत्नीने हा फोटो शेअर करीत असताना लिहिलंय की, ‘तुझा चेहरा मी पुन्हा पाहू शकते’.
शाहिद नव्या फोटोत खूप सुंदर दिसत आहे. त्याची नवी हेअरस्टाईलदेखील चांगली आहे.
शाहिदचा ‘पद्मावती’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. यात तो राणी पद्मावतीचे पती राजा रतन सिंगची भूमिका साकारत आहे.