बिग बॉस या वादग्रस्त रिअॅलिटी शोची स्पर्धक तथा अभिनेत्री अर्शी खान हिने २०१५-१६ मध्ये एक खुलासा करून सगळ्यांनाच धक्का दिला होता. होय, अर्शीने त्यावेळी खुलासा केला होता की, ती पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी याच्या मुलाची आई बनणार होती. सध्या अर्शी बिग बॉसच्या सीजन ११ मध्ये सहभागी असून, बºयाच काळानंतर तिने या रहस्यावरून पडदा उचलला आहे.
तिने घरात प्रवेश करताच स्पष्ट केले की, मी शाहिद अफ्रिदीबद्दल खोटं बोलली होती. सलमान खान होस्ट करीत असलेल्या या शोच्या एका टास्कदरम्यान अर्शीने सांगितले होते की, ‘काही बातम्या अशा प्रसिद्ध झाल्या होत्या, ज्यामध्ये चुकीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याकाळी चर्चेत राहण्यासाठी मी जाणूनबुजून अशा प्रकारचे वक्तव्य केले होते, ज्याचे वास्तवाशी काहीही देणेघेणे नाही.’ अर्शीच्या या खुलाशानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. अर्शीने हे रहस्य तेव्हा उघड केले जेव्हा एका टास्कदरम्यान प्रत्येक स्पर्धकाला त्याच्या आयुष्याशी निगडित एका घटनेचा खुलासा करायचा होता. सध्या या शोमध्ये अर्शी सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धकांपैकी एक आहे. अर्शी घरातील तिच्या वागणुकीवरून नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी अर्शी प्रियांक शर्मा आणि सपना चौधरी यांनी उघड केलेल्या तिच्या काही खासगी गोष्टींमुळे चर्चेत आली होती. त्यानंतर अर्शीने तिचा मित्र आकाश ददलानी याच्यासोबत असे काही वर्तन केले ज्यामुळे त्याचे शोषण झाल्याची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा तिचा प्रियांक शर्माबरोबर वाद झाला असून, ती चर्चेत आली आहे. एकूणच घरातील सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धकांमध्ये अर्शी खान हिचेही नाव असून, ती घरात जेवढी चर्चेत आहे, तेवढीच बाहेरच्या दुनियेत चर्चित आहे. त्याचबरोबर अर्शीने अफ्रिदीबद्दल केलेला खुलासा ऐकून एक गोष्ट आणखी स्पष्ट होते की, चर्चेत राहण्यासाठी अर्शी काहीही करू शकते. असो, अर्शीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना पसंत येत असल्यानेच ती आज घरातील प्रबळ स्पर्धकांपैकी एक आहे.