Sunday, May 26, 2024
Homeमनोरंजनसोशल मिडियावर पसरतोयं सारा अली खानचा ‘हा’ हॉट वर्कआऊट व्हिडिओ!

सोशल मिडियावर पसरतोयं सारा अली खानचा ‘हा’ हॉट वर्कआऊट व्हिडिओ!

सैफ अली खान व अमृता सिंगची लाडकी लेक सारा अली खान स्टारकिड्समध्ये सर्वाधिक लोकप्रीय आहे. केवळ सौंदर्याच्याबाबतीतच नाही तर स्टाईल स्टेटमेंट असो वा फिटनेस मेंटन अशा सर्व गोष्टींमुळे सारा चर्चेत असते. लवकरच सारा  ‘केदारनाथया चित्रटातून   बॉलिवूड डेब्यू करतेय. अलीकडे तिने या चित्रपटाच्या शूटींगचे एक मोठे शेड्यूल संपवले. त्यामुळे तूर्तास साराकडे बराच मोकळा वेळ आहे. या फावल्या वेळात सारा काय करतेय? तर जिममध्ये घाम गाळतेय. होय, सध्या साराचा बराच वेळ जिममध्ये जातोय. तिचा वर्कआऊट करतानाचा एक हॉट व्हिडिओही समोर आला आहे. सध्या हा व्हिडिओ वाºयाच्या वेगाने व्हायरल होतो आहे. या व्हिडिओ सारा स्टेबिलिट चेअरवर साईड स्टेपअप्स करताना दिसतेय.

सारा अली खान स्वत:ला फिट ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतेय. जिममध्ये घाम गाळण्यासोबतचं स्वत:च्या डाएटवरही ती लक्ष देतेय. आता या सगळ्यांचा परिणाम साराच्या चेहºयावर दिसू लागला नसेल तर नवल. सारा दिवसांगणिक अधिक सुंदर, अधिक फिट दिसू लागलीय, याचे सगळे श्रेय तिच्या या कष्टांना द्यायला हवे.
तूर्तास साराकडे अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स येत असल्याचे कळतेयं. मध्यंतरी साराने अनुष्का शर्माच्या बॅनरखाली तयार होणारा चित्रपट साईन केल्याची चर्चा होती. अर्थात असे काही नसल्याचा खुलासा साराने नंतर केला होता.‘केदारनाथ’ हा चित्रपट २०१३ मध्ये  केदारनाथमध्ये आलेल्या जलप्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. चित्रपटात सारा एका अतिशय साध्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रत्यक्षात सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विसंगत असणार आहे. तूर्तास या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे. उत्तराखंडमध्ये असलेल्या गोठवणा-या थंडीमुळे शूटींगमध्ये अडचणी येत असल्याचे कळतेय. पण लवकरच चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. या चित्रपटात सारा सुशांतसिंग राजपूतसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments