अनिल कपूर हा आज बॉलिवूडमधील सगळ्यात फिट अभिनेता मानला जातो. अनिलने वयाची साठी पार केली असली तरीही आज तो तितकाच तरुण दिसतो. बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केल्यानंतर २४ या मालिकेद्वारे अनिल छोट्या पडद्यावर वळला. त्याच्या या मालिकेचा देखील प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. आता अनिलच्या पावला वर पाऊल ठेवून त्याचा भाऊ संजय कपूरने करिश्मा या मालिकेद्वारे २००३ मध्ये छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. आता स्टार प्लसवरील आगामी शो दिल संभल जा जराद्वारे संजय छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. संजय देखील त्याच्या भावाप्रमाणे प्रचंड फिट आहे. आपल्या फिटनेसबद्दल बोलताना संजय कपूर सांगतो, मी या वयातही वर्कआऊट करतो. मी काही अंशी अनिल पेक्षा अधिक फिट आहे.
अनिल कपूर आणि संजय कपूर हे दोघेही बंधू फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सतर्क आहेत. आपल्या एका मुलाखतीमध्ये संजय म्हणाला होता की, त्याचा फिटनेसवर विश्वास आहे आणि फिटनेस क्रेझ या इंडस्ट्रीत यायच्या कित्येक वर्षं आधीपासूनच तो नियमित व्यायाम करत आहे. तो सांगतो, “मी अगदी तरूणपणापासूनच फिट राहण्यासाठी योग्य आहार घेतो. मला जमेल तेवढे जंक फूड मी टाळतो आणि हा मंत्र सर्वांनी आत्मसाद केला पाहिजे यासाठी प्रयत्न करतो. अनिल पण जंक फूड टाळण्याचा खूप प्रयत्न करतो पण त्याचेही चीट डेज असतात. मी फक्त एवढेच म्हणू शकतो की, मी त्याच्यापेक्षा जास्त फिट आहे.”
संजय कपूर स्टार प्लसवरील आगामी शो दिल संभल जा जरा मध्ये दिसून येणार असून या मालिकेसाठी तो विक्रम भट्टसोबत अनेक वर्षांनंतर काम करणार आहेत. ह्या शोमध्ये निकी वालिया आणि स्मृती कालरा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
संजय कपूरने राजा, प्रेम, औजार, डरना मना है, एलओसी कारगिल, शानदार यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या त्याच्या अभी नही तो कभी नही या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.