Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजन‘खान’ कुटुंबात संगीता बिजलानीची वापसी!

‘खान’ कुटुंबात संगीता बिजलानीची वापसी!

संगीता बिजलानी व सलमान खानचे ब्रेकअप झाले, लग्न फिस्कटले. पण त्यांची मैत्री मात्र यानंतरही कायम होती. सलमानच्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमात संगीता आवर्जून दिसायचीच दिसायची. पण अलीकडे सलमान व संगीताची मैत्री तुटल्याची चर्चा रंगली होती. ही चर्चा होण्यामागचे कारण होते, सलमानच्या घरच्या इव्हेंटमधून संगीताचे अचानक गायब होणे. होय, गेल्या कित्येक महिन्यांत संगीता सलमानच्या घरी फिरकली नव्हती. पण आता संगीता सलमानच्या घरी पुन्हा एकदा परतली आहे.

सलमान व संगीताच्या मैत्रीत अचानक मतभेद निर्माण होण्यामागे युलिया वंतूरचा (सलमानची कथित रोमानियन गर्लफ्रेन्ड) हात असल्याचे बोलले गेले होते. युलिया व संगीता एकाच जिममध्ये वर्कआऊट करतात. याठिकाणी एका क्षुल्लक कारणावरून युलियाने म्हणे जोरदार तमाशा केला होता.  यानंतर संगीताने युलियापासूनच नव्हे तर सलमानच्या कुटुंबापासूनही अंतर राखणे सुरु केले होते. संगीता सलमानला २०१६ च्या नोव्हेंबरमध्ये अखेरची भेटली होती. यानंतर संगीता सलमानच्या कुटुंबाच्या कुठल्याही सदस्यासोबत दिसली नाही.  पण आता संगीता पुन्हा परतली. सलमानचे अब्बू सलीम खान यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत संगीता सामील झाली. कदाचित सलमानने संगीताची समजूत काढलीयं आणि संगीतानेही सगळे मतभेद दूर सारून सलमानच्या कुटुंबाला जवळ केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments