Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजनबनियानवर डॅशिंग अंदाजात सलमान, थंडीने कुडकुडत आहे जॅकलीन!

बनियानवर डॅशिंग अंदाजात सलमान, थंडीने कुडकुडत आहे जॅकलीन!

Salman Khan, Jackline Farnandis, Kashmirबॉलिवूडचा दबंग सलमान खान सध्या अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्यासोबत कश्मीरच्या निसर्गरम्य खोºयात सैर करीत आहेत. दोन्ही स्टार्स रेमो डिसूजाच्या आगामी ‘रेस-३’च्या शूटिंगसाठी सोनमर्ग येथे पोहोचले आहेत. सोनमर्ग या निसर्गरम्यस्थळी या दोन्ही स्टार्सवर सध्या एक रोमॅण्टिक गीत शूट केले जात आहे. गुरुवारी जॅकलीनने सेटवरील एक खास फोटो शेअर केला. ज्यामध्ये ती सलमान खानसोबत बघावयास मिळत आहे. थंडीमुळे जॅकलीन कुडकुडत असून, तिने अंगावर चादर पांघरून घेतले आहे. तसेच ती कॉफी पिताना दिसत आहे. मात्र  तिच्या शेजारीच उभा असलेला सलमान चक्क बनियानवर दिसत असून, त्याच्यावर थंडीचा कुठलाही प्रभाव दिसून येत नाही. डेनिम लूकमध्ये सलमान अतिशय डॅशिंग अंदाजात उभा असल्याचे दिसत आहे. 

जॅकलीनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. या फोटोला केवळ एकाच तासात सहा लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर ‘रेस-३’च्या सेटचे बरेचसे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दरम्यान, दºया-खोºयांमध्ये जॅकलीन पहिल्यांदा शूटिंग करीत आहेत. मात्र सलमानने अगोदरही याभागात शूटिंग केली आहे. ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटावेळी तो कित्येक महिने याच भागात तळ ठोकून होता. गेल्यावेळेस या दोघांना ‘हॅँगओवर’ गाण्यावर रोमान्स करताना बघण्यात आले होते. आता ‘रेस-३’मध्ये हे दोघे एक रोमॅण्टिक ट्रॅक करताना दिसून येणार आहेत. ‘किक’च्या यशानंतर सलमान आणि जॅकलीन ही ब्लॉकबस्टर जोडी दुसºयांना अ‍ॅक्शन थ्रिलर करताना दिसणार आहेत. चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ईदनिमित्त प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील सर्व स्टारकास्टचा फर्स्ट लूक समोर आला असून, चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments