Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजन‘साहो’ च्या दिग्दर्शकाचे प्रेक्षकांना पुन्हा चित्रपट पाहण्याचे आवाहन

‘साहो’ च्या दिग्दर्शकाचे प्रेक्षकांना पुन्हा चित्रपट पाहण्याचे आवाहन

नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘साहो’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुजीत सिंहने आपल्या इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. प्रेक्षकांनी पुन्हा एकदा चित्रपट पाहावा असे आवाहन या पोस्टमध्ये केले आहे. सुजीने या पोस्टमध्ये त्याचा चित्रपटसृष्टीतील प्रवास शेअर केला आहे. प्रेक्षकांनी ‘साहो’ पुन्हा एकदा का पाहावा याबाबत देखील या पोस्टमध्ये लिहिले आहे.

मी चुकांमधून शिकलो – सुजीत सिंह

सुजीतने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की,” मी वयाच्या 17 व्या वर्षी पहिली शॉर्ट फिल्म तयार केली होती. त्यावेळी माझ्याकडे पैसा, टीम काहीच नव्हते. पण ऑरकुट आणि परिवाराचा पूर्ण पाठिंबा मिळाला होता. शॉर्ट फिल्ममधील 90 भाग मी स्वतः चित्रित, दिग्दर्शन आणि एडिट केला होता.”

सुजीतने पुढे लिहिले की, ”मी माझ्या चुकांपासून शिकलो आहे. इथपर्यंत येण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण कधी हार मानली नाही. आज अनेकांनी ‘साहो’ पाहिला. पण काहींनी चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा केल्या होता. पण चित्रपट अनेकांच्या पसंतीस पडला आहे. फिल्म पाहण्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. जर काही राहिले असेल पुन्हा एकदा चित्रपट पाहा. चित्रपट पाहाताना तुम्हाला नक्कीच आनंद होईल अशी मला आशा आहे.”

वाईट रिव्ह्यूनंतरही चित्रपटाने केली चांगली कमाई

शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या ‘साहो’ चित्रपटाला निगेटीव्ह रिव्ह्यू मिळाले होते. पण असे असूनाही ‘साहो’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसून येत आहे. चित्रपटाचने सुरुवातीच्या पाच दिवसांत जगभरात 350 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शच्या ट्वीट नुसार, ‘साहो’च्या हिंदी व्हर्जनने 5 दिवसांत 100 कोटींचा गल्ला पार केला आहे. तर शुक्रवारी 24.40 कोटी, शनिवारी 25.20 कोटी, रविवारी 29.48 कोटी रुपये, सोमवारी 14.20 कोटी रुपये आणि मंगळवारी 9.10 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने भारतात 102.38 कोटींचा गल्ला जमवला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments