दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि त्याचं गाड्यांवरचं प्रेम जगजाहीर आहे. वेगवेगळ्या कार आणि कार स्टंट ही तर रोहित शेट्टीच्या सिनेमांची खास ओळख आहे. रोहितचं हेच कारप्रेम पुन्हा एकदा समोर आलं आहे. रोहित सध्या ‘सर्कस’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. तर जॅकलीन फर्नांडीस, पूजा हेगडे हे कलाकार या सिनेमात पाहायला मिळतील.
View this post on Instagram
‘सर्कस’च्या सेटवरचा एक व्हिडिओ रणवीर सिंहने नुकताच शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंहचा फक्त आवाज एकू येत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शेट्टी एक लहानशी कार चालवत असल्यास दिसतंय. अगदी एखाद्या Jaguar कारप्रमाणे दिसणारी ही लहानशी कार रोहित चालवत आहे. सर्कस सिनेमाच्या सेटवर फावल्या वेळात रोहित या कारसोबत खेळत होता. त्याच्या नकळतपणे रणवीरने त्याचा हा व्हिडीओ शूट केला आहे.
या व्हिडिओच्या सुरुवातीला रणवीर सिंगने रोहितचं कौतुक केलं आहे. जगातील सर्वात अवघड कार स्टंट दिग्दर्शक असं म्हणत रणवीरने रोहितचं कौतुक केलं आहे. ‘रोहितचं काम मनावर घ्या’ असं कॅप्शन रणवीरने व्हिडिओला दिलंय. या व्हिडिओवर अर्जुन कपूरनं कमेंट केलीय. हा व्हिडिओ पाहून मलाही या सर्कसमध्ये एण्ट्री घ्यावी वाटतेय असं अर्जुन म्हणाला आहे.