skip to content
Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजनरणवीर-दीपिकाचा होणार नाही साखरपुडा?

रणवीर-दीपिकाचा होणार नाही साखरपुडा?

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आपल्या वाढदिवशी ५ जानेवारी रोजी  तिच्या चाहत्यांना एक खूप मोठे सरप्राइज देणार असल्याची चर्चा . मीडिया रिपोर्ट्सनुसार दीपिका बॉयफ्रेंड रणवीर सिंगसोबत साखरपुडा करणार असल्याची शक्यता आहे. अतिशय सीक्रेट अशा पद्धतीने हा साखरपुडा उरकला जाणार असल्याची चर्चा होती. परंतु  दोघे साखरपुडा करणार नसल्याची माहिती समोर आहे. दोघांनी पुढची काही वर्षे लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण सध्या दोघेही त्यांच्या करिअरवर फोकस करीत असून, लग्न किंवा साखरपुड्यासारखा कुठलाही निर्णय घेणार नाही.

दरम्यान, दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कुठल्यातरी कारणावरून तू तू मैं मैं सुरू असल्याची चर्चा होती. मधल्या काळात तर अशाही बातम्या आल्या होत्या की, या दोघांचे ब्रेकअप झाले आहे. मात्र दोघांनीही त्यांच्यातील नाते आणखी दृढ करण्यासाठी पुढाकार घेतल्यानेच त्यांचे नाते अजून टीकून आहे. न्यू इअर सेलिब्रेशनसाठी रणवीर एकटाच विदेशात रवाना झाला होता. तो टायगर श्रॉफ आणि दीशा पाटनीसोबत मुंबई विमानतळावर स्पॉटही झाला होता. पुढे हे तिघेही श्रीलंकेला रवाना झाले होते. तर दीपिका काही दिवसांपूर्वीच विअना येथे स्पॉट झाली होती.

दीपिकाचा वाढदिवशी ५ जानेवारी रोजी बॉयफ्रेंड रणवीरसोबत साखरपुडा करणार असल्याची चर्चा होती. परंतु हे दोघे सध्या त्यांच्यातील नात्याबद्दल खूपच विचारविमर्श करीत असल्याने ते साखरपुडा करणार नसल्याचेही समोर येत आहे. खरं तर अद्यापपर्यंत दोघांनीही त्यांच्यातील नात्याचा जाहीरपणे स्वीकार केलेला नाही. त्यातच दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण यांनी म्हटले होते की, दीपिका आणि रणवीर दोघेही सज्ञान असले तरी, त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांना फारसे माहिती नाही. तसेच त्यांनी हेदेखील स्पष्ट केले होते की, दीपिकाला पूर्ण स्वातंत्र्य असून, तिने तिच्या आयुष्याचा निर्णय घ्यावा. दीपिका आणि रणवीर संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहेत. हा चित्रपट सध्या वादाच्या भोवºयात सापडला असून, तो केव्हा रिलीज होईल, हे अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments