Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमनोरंजनजान्हवी कपूरच्या 'गुंजन सक्सेना’चा फर्स्ट पोस्टर

जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना’चा फर्स्ट पोस्टर

देशातील पहिल्या महिला एअरफोर्स अधिकारी गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकचे पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. इंस्टाग्रामवर पोस्टर शेअर करताना करण जोहरने लिहिले की – कारगिल गर्ल गुंजन सक्सेना २४ एप्रिलला टेक ऑफ करण्यास तयार आहे. पोस्टरमध्ये जान्हवी गुंजन सक्सेनाच्या रुपात दिसत आहे. त्याचबरोबर अधिकारी त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करीत आहेत.

 गुंजनची बायोपिक शरण शर्मा यांनी दिग्दर्शित केली आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, हीरू, अपूर्व मेहता आणि झी स्टुडिओ यांनी केली आहे. चित्रपटाची कथा निखिल मेहरोत्रा, शरण यांनी लिहिली आहे. चित्रपटात अंगद बेदी गुंजनचा भाऊ अंशुमनच्या भूमिकेत दिसणार आहेत. पंकज त्रिपाठी त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत असतील. या चित्रपटात मानव विज आणि विनीतकुमार सिंग देखील मुख्य भूमिका

साकारणार आहेत.

काय आहे गुंजनच्या वीरतेची कथा आहे

१९९९ च्या कारगिल युद्धाच्या वेळी गुंजन सक्सेना यांनी चिता हेलिकॉप्टरने निडरपणे उड्डाण केले होते. ४४ वर्षीय गुंजन आता सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांना कारगिल गर्ल म्हणून ओळखले जाते. त्यांना शौर्य पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments