Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeदेशप्रियंका चोपडा काय म्हणाली डोनाल्ड ट्रम्प बद्दल!

प्रियंका चोपडा काय म्हणाली डोनाल्ड ट्रम्प बद्दल!

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या तिच्या प्रोजेक्टपेक्षा वादग्रस्त कारणांमुळेच अधिक चर्चेत राहताना दिसत आहे. पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीसोबत केलेल्या विविध ब्रॅण्डचे करार मोडीत काढणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता प्रियंका चक्क अमेरिकी राष्ट्रती डोनाल्ड ट्रम्पची खिल्ली उडविल्यामुळे चर्चेत आली आहे. त्याचे झाले असे की, एका मुलाखतीदरम्यान प्रियंकाला विचारण्यात आले की, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार? यावर उत्तर देताना प्रियंकाने म्हटले की, ‘सद्य:स्थिती पाहता कोणीही अमेरिकेचा राष्ट्रपती होऊ शकतो. मला हे विस्ताराने सांगण्याची गरज नाही. तुम्हाला सर्व काही माहिती आहेच.

प्रियंका चोपडाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिक पक्षातर्फे आघाडीवर असलेल्या डोनाल्ड ट्रम्पवर त्यांच्या मुस्लीमविरोधी विधानावरही टीका केली होती. ट्रम्प यांनी मुस्लीम प्रवाशांना अमेरिकेत प्रतिबंध केले जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावर टीका करताना प्रियंकाने म्हटले होते की, तुम्ही अशाप्रकारे कोणावरही प्रतिबंध लावू शकत नाही. असो, प्रियंकाने नुकतेच एका आंतरराष्ट्रीय साप्ताहिकासाठी दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा ट्रम्पवर निशाणा साधल्याचे दिसून आले.
यावेळी प्रियंकाने तिच्या लग्न आणि मुलांवरूनही वक्तव्य केले होते. मला खूपसारे मुले जन्माला घालायची आहेत. मात्र समस्या ही आहे की, हे सर्व कोणाबरोबर करणार हे मला माहीत नसल्याचे प्रियंकाने म्हटले होते. सध्या प्रियंका टीव्ही मालिका ‘क्वांटिको’च्या सीजन-३ ची शूटिंग करीत आहे. या व्यतिरिक्त ती ‘ए किड लाइक जॅके’ आणि ‘इज नॉट इट रोमॅण्टिक’ या हॉलिवूडपटांच्याही शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments