मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी चाहत्यांनी सेलिब्रेशन स्पोर्टस क्लब परिसरात प्रचंड गर्दी केली. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामुळे एकच पळापळ झाली.
रात्री दुबईहून श्रीदेवीचा पार्थिव मुंबईत पोहला तेंव्हा पासून चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सेलिब्रेटींसह,नेत्यांचीही अंतिम दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहेत. तर चाहते हजारोच्या संख्येने अंतिम दर्शनासाठी जमले आहेत. चाहत्यांना पांगवण्यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. थोड्याच वेळात श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. विलेपार्ले स्मशानभूमित अंतिम संस्कार होणार आहे.